CDS Bipin Rawat : जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम; अनंतात विलीन

  • 2 years ago
#CDSGeneralBipinRawat #HelicopterCrash #MaharashtraTimes
सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका अनंतात विलीन झाले. नवी दिल्ली कंटोमेंट बोर्डातील बरार स्क्वेअरमध्ये बिपीन रावत यांना संपूर्ण लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला १७ तोफांची सलामी देण्यात आली.अंत्यसंस्कारावेळी तिन्ही दलांचे प्रमुख आणि ८०० जवान उपस्थित होते. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तरिनी यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

Recommended